राकेश करमळकर /आजरा ;
आजरा तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बुधवारी मध्यरात्री आजरा शहरातील एका नामांकित डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. संबधित डॉक्टरांचा कोरोनाचा अहवाल काही दिवसापूर्वी पॉझिटीव्ह आला होता.
एका सहकारी संस्थेच्या कोरोनाबाधित माजी कार्यकारी संचालक यांच्या संपर्कात डॉक्टर आले होते. ती व्यक्ती बाधीत झाल्यानंतर दोन दिवसात डॉक्टरांना त्रास होवू लागल्या नंतर अॅडमिट करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे निधन झाले. आजरा शहरातील ते पहिले एमबीबीएस डॉक्टर होते.
आजरा तालुका इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते आजरा ताालुक्यात काेराेनामूळे दाेन महिन्यात सहा जणांचा मृत्यु झाला आहे. आज हा सातवा मृत्यु आहे. काेराेन प्रतिबंधासाठी प्रशानाकडून विविध उपांत्ययाेजना केल्या जात आहेत. समुहसंसर्ग टाळण्यासाठी प्रशासन यंत्रणा धडपडत आहे
0 Comments