पेठ वडगाव नगरपरिषदेचे गणेश तलाव या ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जनात बंदी




वडगाव हद्दीतील सर्व घरगुती गणपती व सार्वजनिक गणपतीच्या मूर्तीचे केले दान

धनंजय खराडे/पेठ वडगांव;
 
प्रशासनाने सर्व नागरिकांना जाहीर आव्हान करण्यात आलेले होते, की सध्या संपूर्ण देशांमध्ये व राज्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश विसर्जनाच्या संभाव्य होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाच्या प्रादुर्भाव मध्ये वाढ होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट, २०२०  रोजी वडगाव नगरपरिषदेचे गणेश तलाव या ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जनात बंदी करण्यात आली आहे, सदरच्या ठिकाण गणेश विसर्जनासाठी बंद करण्यात आलेले आहे. 
कोरोना चा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेश मूर्तीचे विसर्जन हे घरामध्ये किंवा मूर्ती बसलेली असेल तर त्याठिकाणी करण्याचे आहे असे आव्हान वडगाव नगरपालिकेने शहरवासीयांना केलेले आहे. तसेच प्रशासनाने गणेश मूर्ती मूर्ती दान करण्यासाठी प्रभागमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती दान करण्याची व्यावस्था उपलब्ध केलेली आहे.

मूर्ती दान करण्याची ठिकाण व सहभागी मंडळाचे नाव खालीलप्रमाणे
1. विद्या कॉलनी -विद्या कॉलनी व नवीन वसाहत                तरुण मंडळ
2. बावडेकर कॉम्प्लेक्स, (रत्नाकर बँक समोर) - युवा कला क्रीडा व संस्कृती मंडळ.
3. नगरपरिषद चौक- उत्कर्ष सामाजिक सेवाभावी मंडळ, सनगर समाज.
4. मरगुबाई देवालय- श्री शिवाजीराव राजाराम सालपे फाउंडेशन
5. स्विमिंग टॅंक (जुना तलाव) लगत-परमधाम सेवा संस्था
6. ठाणेकर चौक - भारत तरुण मंडळ
7. श्री.बिरदेव चौक (श्री. बाळूमामा मंदिर शेजारी)- होळकर तरुण मंडळ
8. यादव कॉलनी अंबाबाई मंदिर-वेंकटेश्वरा तरुण मंडळ
9. शिवाजी चौक - यंग स्पोर्टिंग क्लब
10. साळी गल्ली - ॲक्टिव ग्रुप
11. भादोले रोड - भगवा ग्रुप
१२. महालक्ष्मी वसाहत - सौजन्य ग्रुप
१३. सावरकर चौक - सावरकर तरुण मंडळ

Post a Comment

0 Comments