उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी घोषित केलेले १ कोटी कुठे गेले?;


शिवसेनेकडून एक पैसाही आला नाही, मंदीर ट्रस्टचा दावा


५ ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत पार पडणार आहे, या सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साह पाहायला मिळत आहे. भूमीपूजनाची जय्यत करण्यात आली आहे. शिवसेनेने राम मंदिर उभारणीसाठी घोषित १ कोटी निधी देणार हे सांगितले होते. त्यापैकी १नवा पैसाही पोहचला नाही असं राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. ह्या मंदिराच्या निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला आहे. त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत. सध्या राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्याशी  महंत गोपाल दास यांच्याशी संवाद साधला त्यात ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल दास यांनी दावा केला आहे की, शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या देणगीची जी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्यातील एक रुपयाही ट्रस्टला मिळाला नाही.

मात्र महंताच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. २८ तारखेला ही रक्कम ट्रस्टकडे जमा झाली असा दावा त्यांनी केला आहे. मात्र महंत यांनी राम मंदिर ट्रस्टला पैसे पोहचले नाहीत असं सांगितल्याने ते १ कोटी रुपये कुठे गेले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


Post a Comment

0 Comments