हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा की नाही यासाठी ग्रामपंचायत हॉल मध्ये सोमवार दि. १०/०८/२०२० रोजी ग्रामपंचायत प्रशासक श्री.एम.जे.पवार यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करणेत आलेले होते.
सदर सभेसाठी गावातील सर्व मंडळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्तरीय कोरोणा दक्षता समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिकसभेसाठी उपस्थित होते सदर सभेत झालेल्या चर्चेनुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीचा गावातील सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करणेचा निर्णय घेणेत आला.
सर्व गणेश मंडळाणी आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार नाही असे निवेदन दिले त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायत मंडप घालणेस परवानगी देणार नाही. त्यामुळे वाठार गावामध्ये चालू वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव बंद करून कोरोणा प्रतिबंध उपाययोजना करणेसाठी गावाने निश्चितच चांगले पाऊल उचलले आहे.
0 Comments