मोहोळ राष्ट्रवादीच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट; शिवसेना नेत्याच्या पुत्राचा गंभीर आरोप


सोलापूर, २८ ऑगस्ट: मोहोळ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याकडे दोन जातीचे दाखले आहेत. असा धक्कादायक खुलासा सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले सादर  केले. यातून आमदार माने सरकारची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.

 पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. त्यामुळे आमदार माने हे मागील १००  वर्षांपासून इंदापूर तालुक्यात राहत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. त्यानुसार यशवंत माने यांच्याकडे SC चे जात प्रमाणपत्र आहे.त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा दावा तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांनी यावेळी केला. याबाबत बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिल्याचा दावा सोमेश क्षीरसागर यांनी केला आहे.


Post a Comment

0 Comments