ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोल्हापूर यांचे वतीने व संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.प्रवीण काकडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ९ वाजता म्हासुर्ली मधला धनगरवाडा येथील सर्पदंशाने मृत विद्यार्थी सुनील गंगाराम घुरके याच्या आर्थिक मदतीबाबत राधानगरी भुदरगड चे आमदार मा. प्रकाश आबिटकर साहेब यांची त्यांच्या गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेतली व विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदन देताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी कुटुंबासाठी सर्वतोपरी आर्थिक मदत देण्याचे तसेच मृत सुनील याच्या आईच्या आजारपणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याचे आश्वासन दिले आहे. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीमध्ये डोंगर दर्यात राहणाऱ्या धनगर समाजबांधवांची रस्ते वीज पाणी आणि आरोग्य या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व अशा प्रश्नांची तड लावण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याची सुद्धा हमी दिलेली आहे.
बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष प्रा. शंकरराव पुजारी , प्रा. मंगेश हजारे जिल्हा संपर्कप्रमुख , मा. दत्तात्रय जोंग जिल्हा संघटक कोल्हापूर, दीपक जोंग राधानगरी तालुकाअध्यक्ष , तानाजी गंगाराम बोडके युवक आघाडी उपाध्यक्ष, अनिल हजारे कागल तालुका अध्यक्ष,बळवंत डोणे कार्यकारिणी सदस्य, प्रकाश झोरे राधानगरी तालुका उपाध्यक्ष,विठ्ठल मलगोंडे भुदरगड तालुका अध्यक्ष, मायाप्पा डोणे उपाध्यक्ष भुदरगड तालुका,तुकाराम भैरू डोणे ,संदीप बाजारी , संभाजी सोमा हजारे ,गणेश पडवळे, गंगाराम बोडके, रामू बाजारी इत्यादी धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments