सिरसावमध्ये कोरोनाचा कहर; एकाच कुटुंबातील तिघांना लागण


गेल्या चावीस तासात ४ नवे रुग्ण

सिरसाव/प्रतिनिधी;

मागील आठ दिवसापासून सुरु झालेले चक्र गावामध्ये थांबत असताना चे चित्र दिसत नाही. बार्शीमध्ये व्यवसाय करत असलेला ३५ वर्षांचा युवक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यांची मुलगी ६ वर्ष, घरातील मुलगी वय १९ वर्ष, याशिवाय ६२ वर्ष वयाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावची स्थिती चिंताजनक बनत आहे.

आजपर्यंत गावातील एकूण १० जनाला कोरोना ची लागण झाली असून त्यातील १ मयत आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सिरसाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments