घरात पाहुणा येणार असल्याचे विराटने दिली ट्विटरवरून माहिती



मुंबई  ; भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. विराट कोहलीनेच ट्विट करून ही बातमी दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की “आणि मग आम्ही तिघेजण असू, जानेवारी 2021 मध्ये येणार!”
 डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्का आणि विराटने लग्न केले. दोघांनी इटलीमध्ये एकमेकांसह सात फेरे घेतले.
विराट आणि अनुष्काच्या या नव्या घोषणेने त्यांचे मित्र, जिवलग मित्र आणि चाहते कुटुंबातील नवीन सदस्याच्या आगमनाच्या शुभेच्छा देतात. अनुष्काच्या या पोस्टचे भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि आलिया भट्ट यांनी अभिनंदन केले, तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार फाफ डु प्लेसी यांनी विराटच्या पोस्टचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments