अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या बाळाचा प्रियकराच्या सांगण्यावरून आईनेचं काढला काटा...

वांगरवाडी बालक खुन प्रकरण 

बार्शी/प्रतिनिधी;

सार्थक स्वानंद तुपे अवघ्या नऊ महिन्याच्या बालकांचे खुन प्रकरण गाजत आहे, बार्शी तालुक्यातील वांगरवाडी येथील बालकाचा खून प्रकरणाने नाट्यमय पद्धतीने वळण घेतले असून त्यांच्या प्रियकराच्या  सांगण्यावरूनच आपण आपल्या पोटाच्या नऊ महिन्याच्या बाळाचा चार्जरने गाळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे असे करण्यात आला आहे.

अश्विनी तुपे व शशिकांत ठोंगे (३६ वर्ष) वांगरवाडी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. बाळ जास्त किरकिर करत असल्यामुळे, अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे असल्यामुळे चार्जरच्या वायर ने गळा आवळून खून केल्याची कबुली अश्विनी तुपे यांनी दिली. अधिक तपास एपीआय शिवाजी जायपत्रे हे करीत आहेत असून न्यायालयाने अश्विनी तुपे व शशिकांत ठोंगे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments