पहिली किसान रेल्वे उद्यापासून; देवळाली ते दानापूर धावणार

देशातील पहिली किसान रेल्वे उद्यापासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे महाराष्ट्रातून जाणार असल्याने यास विशेष महत्व असणार आहे. मंत्री पीयूष गोयल यांनी बजेटमध्ये केलेल्या घोषणेनुसार पहिली रेल्वे ट्रेन महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूर यादरम्यान धावणार आहे.


पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप (PPP) याद्वारे कोल्ड चेन आणि शेतमालाची वाहतूक व विक्री करण्याची ही सेवा असणार आहे. कोल्ड सप्लाय चेन सुरू झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. पहिली रेल्वे महाराष्ट्र व बिहार या दोन राज्यांतील शेतकऱ्यांना जोडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार ही नवीन सेवा सुरू केली जात आहे. या रेल्वेद्वारे अन्नधान्य, भाजीपाला व फळे यांची वाहतूक योग्य पद्धतीने करण्याची सोय केली जाणार आहे.

या पहिल्या ट्रेनद्वारे नाशिक भागातील कांदा पटना, इलाहाबाद, कटनी, सतना या शहरात आणि त्या भागात पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.


Post a Comment

0 Comments