पंढरपूर/ प्रतिनिधी;
पंढरपुर, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. गुरुवारी सकाळपासून परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पंढरीत आज ढगाळ हवामान असून, काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. वीर धारण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नीरा देवघर, वडीवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वीर धरणाचा एक दरवाजा एक फुटाने उचलण्यात आला असून १३ ऑगस्ट रोजी नीरा नदीपात्रात ३२३६८ क्युसेक व वीजनिर्मिती प्रकल्पासाठी ८०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.नीरा नदी पात्रात एकूण ३२३६८ क्युसेकने विसर्ग सुरू असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
पंढरपुर तालुका पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब १५ मिमी, पट कुरोली ४ मिमी, भंडीशेगाव १५ मिमी, भाळवणी १८ मिमी, कासेगाव १८ मिमी, पंढरपूर ८ मिमी, तुंगत १० मिमी, चळे १७ मिमी, पुळुज ७ मिमी तालुक्यात एकूण पाऊस ११२ मिमी नोद झाली आहे.
0 Comments