लाजरस कदम/वाठार;
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत हॉल मध्ये बुधवार दि.१२ रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत गावातील सर्व व्यापारी दुकानदारांनी शुक्रवार दि.१४/०८/२०२० ते गुरुवार दि. २०/०८/२०२० अखेर रात्री १२.०० पर्यंत वैद्यकीय सेवा,मेडिकल दुकाने, व दुध संस्था वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. व्यवहार जर चालू ठेवलेस साथ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत फौजदारी गुन्हा व दंड आकारणेत येईल.
तसेच या सात दिवस बंद च्या काळात संपूर्ण गावामध्ये अंगणवाडी सेविका,आशासेविका,आरोग्य विभागाचे कर्मचारी व तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांच्या मार्फत प्रत्येक घरातील व्यक्तीचा सर्व्हे करण्यात येणार आहे. तरी गावातील व्यक्तींनी त्यांना सहकार्य करावे असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे. यावेळी गावातील सर्व मंडळे, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्तरीय कोरोणा दक्षता समिती व गावातील प्रतिष्ठित नागरिकसभेसाठी उपस्थित होते.
0 Comments