राकेश करमळकर/आजरा;
जिल्ह्यात कोरोना साथीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आज आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार कार्यालय, कृषी कार्यालयानंतर आता नगरपंचायतीच्या मध्ये कोरोना शिरकाव झाला आहे.
गुरुवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तलाठ्यांच्या संपर्कात आल्यामुळे ते स्वतः हून क्वारंटाईन झाले होते. मात्र, गुरुवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
0 Comments