विठ्ठलाच्या पायावर सॅनिटायझर फवारण्यास विरोध!

 

पंढरपूर: कोरोना पार्श्वभूमीवर  गेल्या पाच महिन्यापासून  बंद असलेली धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आता सर्वच स्तरातून आवाज उठू लागला असताना पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील दर्शनाबाबत एक वेगळी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकण्यास आमचा ठाम विरोध राहील, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.

विश्व वारकरी सेना वंचित बहुजन आघाडीच्या सोबतीने १ लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. अशावेळी सरकारचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात चरणांवर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. 

एखाद्या करोनाग्रस्त भाविकाने विठुरायाच्या चरणांवर माथा टेकून दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकालाही करोना संसर्गाची भीती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविला आहे.

Post a Comment

0 Comments