परिवारातील अन्य सहा सदस्यांचा अहवालही पॉझिटीव्ह
कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर अजुनही सुरुच असून शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर यांनाही करोनाची लागण झाली आहे.
ठाकूर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. आमच्या संपर्कात आलेल्यानी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.
0 Comments