पाण्यात कोरोना जगू शकतो?


वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी चे महत्वपूर्ण संशोधन.

🖋️ धनंजय कुंभार

कोरोना या महामारीच्या काळामध्ये काय वापरावे काय नाही? कोणती गोष्ट कितपत सुरक्षित आहे? कोणती गोष्ट सुरक्षित नाही? आणि जीवन उपयोगी गोष्टींचा कोरोनाशी संबंध येऊ शकतो का? आणि जर येत असेल तर त्या गोष्टी वापरणं सुरक्षित आहे का? असे किती तरी प्रश्नः संशोधकांना भेडसावत आहेत. त्याचमुळे कोरोना वरती या दिशेने वारंवार नवनवीन संशोधन केले जात आहे. रशिया मधील "वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी" या संस्थेमधील संशोधकांनी अशाच एक अभ्यास केला आहे. त्यांनी कोरोना व्हायरस पाण्यामध्ये किती काळ तग धरू शकतो यावर महत्वपुर्ण संशोधन केलेलं आहे. रशिया मधील "टॅस" या आघाडीच्या वृत्तसंस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 

या संशोधनामध्ये कोरोना हा व्हायरस पाण्यामध्ये जिवंत राहू शकतो आणि तो किती कालावधी साठी राहू शकतो यांची उत्तरे शोधली गेली आहेत. या संशोधनातून समोर आलेली निरीक्षणे टॅस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत. 

➡ कोरोना व्हायरस पाण्यामध्ये जिवंत राहू शकतो.
➡ पण कोरोना व्हायरस चा पाण्यामध्ये नाश देखील होतो.
➡ बाकीच्या पृष्ठभागांच्या तुलनेत हा व्हायरस पाण्यात जास्त काळ जिवंत राहू शकत नाही.
➡कोरोना विषाणू पाण्यातून नष्ट होणं हे त्या पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते.
➡पाणी गरम असेल तर पाण्यामधून हा विषाणू खूप लवकर पूर्णतः नष्ट होतो
➡सर्वसामान्य तापमानातही हा विषाणू पाण्यामध्ये नष्ट होतो पण त्यासाठी तुलनेने अधिक कालावधी लागतो.
➡सर्व सामान्य तापमानात हा व्हायरस ९०% नष्ट होण्यास चोवीस तास म्हणजेच एक पूर्ण दिवस लागतो, आणि पूर्णतः नष्ट होण्यास म्हणजेच ९९.९% व्हायरस नष्ट होण्यास ७२ तास इतका कालावधी लागतो.
➡पण तेच जर पाणी उकळले असेल तर हा व्हायरस पूर्णपणे नष्ट होऊन जातो.

या अभ्यासातून कोणते पाणी पिणे सुरक्षित आहे हे समजण्यास सोपे झाले आहे.  पाणी निर्जंतुक करण्याचे फिल्टर असतील तर त्यातील पाणी पिणे हे सुरक्षेच्या दृष्टीने उत्तमच आहे, पण जर असे फिल्टर नसतील तर पिण्याचे पाणी आधी उकळवून थंड करून पिणे हेच योग्य असेल. पाणी उकळवून पिणे हे फक्त कोरोना संसर्गापासूनच नाही तर इतरही अनेक आजारांपासून संरक्षण करत. त्यामुळे या महामारीच्या काळात पाणी उकळे पर्यंत गरम करून, नंतर थंड करून पिणे हा पाण्यातून पसरणाऱ्या संक्रमणा पासून वाचण्याचा योग्य पर्याय ठरू शकतो.




Post a Comment

2 Comments