युरिया खताचा पुरवठा वाढवा; भाऊसाहेब झोळ



जेऊर/ प्रतिनिधी;

दि. १९: चालू वर्षी पाऊस पाणी चांगले असल्यामुळे पीकपाणी चांगले आहे त्याला खते देण्यासाठी युरिया खतासोबत ईतर महागड्या खतांचे लिंकिंग केले जाते, ते शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून कृषी खाते केंद्र व राज्य सरकारने यात लक्ष घालून योग्य रित्या शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे त्याचा पुरवठा वाढवावा.
_____________________
लोकवार्ता च्या फेसबुक पेजला लाईक करा..
https://www.facebook.com/लोकवार्ता-100352161772004/
_____________________

कृषी विभागाने त्वरित लक्ष घालून हि मागणी पूर्ण करावी,राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांना हव्या त्या प्रमाणात युरिया खत मिळत नाही. काही युरियाच्या एक, दोन बॅगांसाठी शेतकऱ्यांवर रांगा लावण्याची वेळ आली. तर काही ठिकाणी युरियाच्या किमतीपेक्षा प्रत्येक बॅगमागे ५० ते १२५ रुयये अतिरिक्त रक्कमेची लूट केली जात आहे. अन्य ग्रेडची खते घेतली, तर युरियाच्या एक किंवा दोन बॅग दिल्या जात आहेत. पावती छापील किमतीची दिली जात असली, तरी एकूण रक्कम घेतल्याची कच्ची पावती दिली जात आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता युरिया खतांचा पुरवठा वाढवा अशी मागणी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब झोळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments