कोरोनाचा साखळी तुटण्या ऐवजी जास्तच होतेय घट्ट


विजय कोळेकर/पेठ वडगांव;

पेठ वडगांव मध्ये कोरोनाचा साखळी तुटण्या ऐवजी जास्तच घट्ट होत असल्याचे पहावयाचे मिळत आहे
आज दिवस भरामध्ये पेठ वडगावच्या विविध प्रभागमध्ये एकूण १२ नवे रुग्ण आढळले.नगरपालिका कडून औषध फवारणी करून भाग निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

याच्या आधी बाहेरील रुग्ण आढळत होते, आता गावातीलच लोक सापडत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेठ वडगाव मधील बाधित रुग्ण संख्या ५७ वर गेली आहे.

पेठ वडगाव मधील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे, नागरिकांनी सतर्क होऊन काळजी घेणे गरजेचे आहे. नगरपालिका कडून वेळो वेळी आवाहन करून सुद्धा नागरिक याचे पालन करत नाहीत. सोशल डिस्टनसिंग वेळोवेळी फज्जा उडताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments