✒️ज्ञानेश्वर तात्या टिंगरे, मु. पो. सारोळा ( बु )
ता. व जि. उस्मानाबाद
चाललो होतो वाटेने
वाटेत भेटला भ्रष्टाचार,
इकडं तिकडं बघून हळूच म्हणाला
मनात कसला चाललाय इचार...
मी म्हणालो,
तुला देशाबाहेर घालवण्यासाठी जनता झालीय एक,
वेळ आलीय प्रत्येकाच्या काळजावर ठोकायची इमानदारीची मेख...
झाले तेवढे बास झाले
आता येथून काढ पळ,
तुला कायमचे घालवण्यासाठी
देवाने मनगटात दिलंय आता बळ...
तुझ्या अस्तित्वामुळे
देशाची होत आहे राख,
देशात तुझ्या मुलांची संख्या
झालीय कितीतरी लाख...
तुझा विस्तार वाढल्यामुळे
जगणं झालंय मुश्किल,
बेईमान खुशाल जगतील अन
इमानदार तेवढे मरतील...
मी म्हणालो,
लवकरात लवकर देशाबाहेर
जायची आली तुझी आता वेळ,
इथून पुढं सहन करणार नाही
तुझा हा बनवाबनवीचा खेळ...
भ्रष्टाचार म्हणाला,
रागावू नको माझ्यावरी
वेळ आली नाही जायची अजून खरी,
मला पोचायचं आहे प्रत्येकाच्या दारी
इमानदारीला पळवून न्यायचं आहे माझ्या घरी...
आता तरी सुरुवात आहे
जनता कशी होरपळतेय बघ,
प्रत्येक बेईमान मला लपवण्यासाठी
जीवाची किती करतोय लगबग...
शेवटी मी म्हणालो,
आता तुझा गाशा गुंडाळ
अन हो लवकरात लवकर चालता,
नाहीतर कचाकचा तुडविन तुला
नागडा करून पालथा...
.
3 Comments
खूप छान.. अतिशय निरागसपणे आणि सोप्या भाषेत मांडलेली व्यथा व विचार.... खूप मस्त.... नवकवीला खूप सार्या शुभेच्छा आणि अशीच सहज सुंदर कलाकृतीचा आस्वाद आम्हाला मिळो अशी इच्छा आहे...
ReplyDeleteखूप छान माऊली
ReplyDeleteखूप छान माऊली
ReplyDelete.. असच लिहीत रहा..