आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी विलास नाईक यांची निवड



राकेश करमळकर/आजरा:
        
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपप्रणीत आजरा शहर विकास आघाडीच्या श्री.विलास अण्णासो नाईक यांचे बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्ष श्रीमती जोस्ना चराटी व तहसीलदार विकास आहेर यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
        
आज सकाळी नगरपंचायतीच्या सभागृहांमध्ये ही सभा झाली. भाजपप्रणीत आजरा शहर विकास आघाडीच्या विलास नाईक यांचा एकमेव अर्ज उपनगराध्यक्ष पदासाठीआला. नगरपंचायतीचे मावळते उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी हे सूचक  तर श्री किरण कांबळे यांनी त्यांना अनुमोदन दिले. निर्धारित वेळेत विलास नाईक यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना उपनगराध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
        
याप्रसंगी भाजप प्रणित आजरा शहर विकास आघाडीचे प्रमुख श्री अशोक चराटी असे म्हणाली की आता नगरपंचायत मध्ये सत्तारूढ व विरोधकांचे समझोता एक्सप्रेस शहराच्या विकासासाठी एकत्र काम करणार आहे.

घनकचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले, तर स्वीकृत नगरसेवक आनंद कुंभार  असे म्हणाले की नूतन उपनगराध्यक्ष श्री विलास नाईक यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संस्थेमध्ये काम करण्याचा फायदा त्यांना या पदावर काम करताना नक्की होणार आहे.  निवडीनंतर नाईक यांचा विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने सत्कार करणेत आला.               
          
या निवडीवेळी नायब तहसिलदार संजय इलके, मावळते उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, विरोधी पक्षनेते किरण कांबळे, नगरसेवक बाळ केसरकर, धनाजी पारपोलकर, सिकंदर दरवाजकर, शुभदा जोशी, संजीवनी सावंत, अस्मिता जाधव, शकुंतला सलामवाडे, सीमा पोवार, यासिराबी लमतुरे, संजय सावंत, लेखाधिकारी प्रविण पाटील यांच्यासह कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार जेष्ठ लिपीक संजय यादव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments