आजरा ग्रामीण रूग्णालयास खासदार फंडातून वैद्यकीय साहित्याचे लोकार्पण



राकेश करमळकर/आजरा;
          
ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांच्या खासदार  फंडामधून वैद्यकीय साहित्याचे वाटप नुकतेच अजरा ग्रामीण रुग्णालय येथे पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देण्यासाठी याचा  अधिक उपयोग होणार आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील अतिदक्षता विभाग अधिक सुसज्जित  होणार आहे.  तालुक्यामधील आरोग्य  यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.
           
नुकतेच आजरा ग्रामीण रुग्णालय येथे या साहित्याचे लोकार्पण करण्यात आले यामध्ये मल्टी पॅरोमीटर  ,ईसीजी मशीन ,बेबी वॉरमेर,लेड फोटो थेरपी बॉईल्स उपकरण,आंमबुबॅग,डिजिटलबी.पी.उपकरण,नेबोलायझर, ड्रेसिंग ड्रम ,वजन करायचे मशीन इत्यादी अत्याधुनिक साहित्य आजरा ग्रामीण रूग्णालयास देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, आजरा तालुका प्रमुख संजय सावंत, युवराज पोवार, शहर प्रमुख ओमकार माध्यळकर, स्वीकृत नगरसेवक अभिषेक शिंपी, नगरसेवक किरण कांबळे यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी हजर होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक फर्नांडिस, तालुका आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर मिलिंद गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments