आजरा तालुक्यात पाऊस ओसरला; चार बंधारे अजूनही पाण्याखाली



राकेश करमळकर / आजरा ;

गेले पाच दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी थोडी उघडीप दिली. शुक्रवार सकाळी पावसाचा जोर थोडा ओसरला, तालुक्यातील हिरण्यकेशी व चित्रा नदी आपले पात्र सोडून वाहत आहे. साळगाव, देवर्डे, ऐनापुर, चांदेवाडी, किटवडे या बंधाऱ्यावरील  पाणी बंधाऱ्याच्या ओसरल्यामुळे या ठिकाणची वाहतूक वाहतूक सुरू झाली नाही. त्यामुळे या भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. तर नदीकाठी शेतामध्ये पाणी गेल्याने तेथील सुमारे ५०० हेक्‍टर ऊस व भात शेतीचे  नुकसान झाले आहे.
         
भादवण, हाजगोळी, शेळके, दाभिल, गजरगाव या बंधाऱ्यावरील पाणी असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तर अतिवृष्टीमुळे अंबाडे बंधारा नजीक भराव टाकून नव्याने बनवण्यात आलेला रोडचा काही भाग पावसामुळे वाहून गेला आहे.
        
पाच दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे ता आजरा तालुक्यात वित्त हानी  झाली आहे. तुकाराम चव्हाण (चव्हाणवाडी), संदीप मिसाळ (आजरा), शांताबाई सुतार (भादवनवाडी), शांताबाई अजगेकर (खोराटवाडी), जयसिंग कोंडुसकर, आनंदा निर्मळे (चांदवाडी) यमुना डोंगरे, दयानंद कांबळे(महागोंड), शंकर नार्वेकर (कोवाड), सिताराम पाटील (सुळेरान), शंकर सरदेसाई (लाटगाव), रामचंद्र आपगे(कानोली), सुमन पाटील (सरोळी), अण्णाप्पा पाटील (मासेवाडी), संभाजी हसबे (दाभिल), शांताराम कांबळे (देवकांडगाव), संपदा जाधव ,मारुती फगरे (पेरणोली) या सर्वांचे मिळून तालुक्यामध्ये सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये इतके नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments