कोल्हापूर ; जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 137 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 7.50 (228.88), शिरोळ- 3.86 (199.29), पन्हाळा- 49 (664.29), शाहूवाडी- 43.67 (947.83), राधानगरी- 55 (953.33), गगनबावडा- 137 (2604), करवीर- 29.09 (495), कागल- 39.86 (663), गडहिंग्लज- 27.14 (481.57), भुदरगड- 36 (784.20), आजरा- 62.75 (1077.75), चंदगड- 72.50 (1077.83) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.
0 Comments