आज पेठ वडगांव मध्ये ११ नवीन रुग्ण



एकूण १०४ रुग्ण झाल्यामुळे लोकांच्या मध्ये भीतीच वातावरण तयार झाले आहे.

प्रतिनिधी /पेठ वडगांव;

वडगांव मध्ये कोरोना पेशंट ची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांना उपचारासाठी फरपट होऊ नये यासाठी सर्व सामन्य नागरिकांच्या मधून वडगांव मध्ये कोव्हीड सेंटर व्हावे अशी मागणी होत आहे.

यासाठी युवकक्रांती आघाडी,यादव पॅनेल,व्यापारी असोसिएशन, शिवछत्र फौंडेशन, विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी विविध माध्यमातून जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली होती.

यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने ,आमदार राजूबाबा आवळे यांनी जिल्हाधिकारी व प्रशासन,स्थानिक डॉक्टर यांचे सोबत चर्चा करून वडगांव साठी लवकरच रूग्णालय होईल असे सांगितले, याचा लाभ पेठ वडगांव व परिसरातील रुग्णासाठी होईल.

Post a Comment

0 Comments