कागल/प्रतिनिधी: महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या असलेल्या वाघापूर ता. भुदरगड येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा कोरोना च्या संकटामुळे रद्द करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक देवस्थान कमिटी ने दिली आहे.पोलीस प्रशासनाकडून यांच्याकडून कडक अमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती भुदरगड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देशमुख यांनी दिली आहे.
दरवर्षी श्रावणाच्या प्रारंभी वाघापूर येथे ही यात्रा भरते .यात्रेसाठी लाखो भाविक वाघापूर मध्ये दाखल होतात कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय स्थानिक देवस्थान समिती, ग्रामपंचायत प्रशासन यांनी घेतला आहे.
भुदरगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित देशमुख यांनी येऊन देवस्थान परिसराची पाहणी केली त्याबरोबरच कडक अंमलबजावणी करण्याचे सूचना दिल्या.
संपूर्ण श्रावण मासात भाविकांना वाघापूर मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. यावेळी सरपंच सौ जयश्री दिलीप कुरडे, देवस्थान समिती अध्यक्ष अरविंद जठार, पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, उपसरपंच संतोष बरकाळे, ग्रामसेवक तानाजी शिंदे ,तलाठी जरग,ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान समिती सदस्य यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments