सिध्दनेर्लीतील तरुण कोरोना पॉझिटिव्ह


कागल/प्रतिनिधी:

दिवसेंदिवस कोरोनाचे थैमान वाढत आहे, ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सिद्दनेर्ली येतील तरुणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर तरुण हा नातेवाईकांच्या सेवेसाठी रुग्णालयात होता. त्या दवाखान्यातील डॉक्टरांसह काही कर्मचारी बाधित झाले होते.हा तरुण त्यांच्या संपर्कात आल्याने बाधित झाला आहे.
सिध्दनेर्ली परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पॉझिटिव्ह तरुणांच्या संपर्कातील लोकांनी पुढे होऊन कोरोना टेस्ट करावी असे आवाहन सिध्दनेर्ली ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments