कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर होणार घरीच उपचार


जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.  परिणामी त्याचा ताण जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. यावर पर्याय म्हणून सौम्य लक्षणे किंवा कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरच्या घरीच उपचार करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.  
      
ग्राम समितीने कोरोना रुग्णांच्या घरी आवश्यक त्या सर्व सोयी किंवा विलगिकरणाची योग्य व्यवस्था असल्याची खात्री केल्यास त्या रुग्णास घरच्या घरी उपचार करून घेता येतील. रुग्णाच्या सेवेस असणाऱ्या व्यक्तीस कोरोना पॉजीटिव्ह रुग्णास लागणारी औषधे आणि त्याची काळजी घेण्यासंबंधित प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर अशा रुग्णास होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. 
        
 विशेष म्हणजे कोरोना रुग्णा कडून एक प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल. ज्यामध्ये होम आयसोलेशनचे पालन करेन, घरातील इतर व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित कोविड केअर सेंटर मध्ये माहिती देईन आदी मुद्यांची पुष्टी करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments