माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत

माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांनी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी दि.  १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १० वी, १२ वी तसेच डिप्लोमा अथवा पदवी परीक्षेत कमीत-कमी ६० टक्के गुण मिळवून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शिक्षण घेत आहेत असे पाल्य शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशीरा मिळाल्यास प्रवेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ज्या पाल्यांनी सीईटी अथवा जेईई किंवा इतर कारणांसाठी गॅप घेऊन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे. अशा प्रकरणामध्ये अर्जासोबत गॅप सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.
शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत-जास्त पाल्यांनी लाभ घ्यावा. आवश्यक कागदपत्रे व अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे ०२३१-२६६५८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments