मत्तीवडेचा सुरेश धोंडीराम खाडे महाराष्ट्रात आठवा; टॅक्स असिस्टंट परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मधे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेमध्ये निपाणी तालुक्यातील मत्तीवडे गावच्या सुरेश धोंडीराम खाडे या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. टॅक्स असिस्टंट या पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रात त्याने आठवा क्रमांक पटकावला आहे. 
दुर्गम भागातून आणि अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण घेत त्याने  कर्नाटक आणि महाराष्ट्र आशा दोन्ही राज्यातील विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.सुरेशचे वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे. त्याच्या या यशासाठी त्याचे मामा कृष्णात सावंत आणि गोपाळ पाटील सर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. निपाणी आणि कागल परिसरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments