५ ऑगस्ट रोजी भारतात श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. ५ ऑगस्टच्या सोहळ्यासाठी अमेरिकेतील टाईम स्क्वेअरची १७ हजार स्क्वेअर फूटची LED स्क्रीन भाडे तत्तावर घेण्यात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत या स्क्रीनवर प्रभू श्रीराम आणि श्रीराम मंदिराची ३ डी प्रतिमा दाखवले जाणार असल्याची माहिती अमेरिकेतील हिंदू समाजाचे नेते आणि अमेरिकन इंडिया पब्लिक अफेर कमीटीचे अध्यक्ष जगदीश शेहानी यांनी दिली.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी अयोध्येत पहिली विट रचून राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. प्रभू श्रीरामांचे फोटो आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराची ३ डी प्रतिमा न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअरवर ५ ऑगस्ट रोजी दाखवले जाणार आहे.
आयुष्यात एकदाच येणारा किंवा शतकातून एकदा पाहिला मिळणार असा हा क्षण इतक्या लवकर आपल्या जीवनात येईल असं वाटलं नव्हतं. मात्र, नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे शक्य होत आहे. त्यामुळे आपल्या हा क्षण ऐतिहासिक पद्धतीने साजरा करायचा आहे, असंही शेहानी यांनी म्हटलं आहे.
0 Comments