आजऱ्यात लॉक डाऊनचा भंग केल्याबद्दल सहा जणांवर गुन्हा ; तर भरारी पथकाची ५३ जणांवर कारवाई ५३०० दंड केला वसूल.

आजरा/प्रतिनिधी: समूह संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यासह सर्वत्र लॉक डाऊन पाळण्यात आला आहे .आजरा शहरात लोक डाऊन चा भंग केल्याबद्दल सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे यांच्याकडून एक चार चाकी वाहन तर 8 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. कारवाई केलेल्यांची नावे अशी आहेत दीपक मारुती सावंत, अरविंद शिवाजी पाटील, सागर गुंडू कातकर, श्रीकांत दाजीबा कातकर, संतोष जानबा पाटील. तर शहरांमध्ये बेकायदा विनापरवाना दारू विक्री केल्याबद्दल दयानंद सदाशिव दड्डीकर (मूळ राहणार ऐनापुर ता. गडहिंग्लज) सध्या राहणार नेवरेकर गल्ली, आजरा याच्यावर कारवाई केली आहे त्याच्याकडून मोटार सायकल व विदेशी मद्याच्या बाटल्या अशा  ३१,४२४/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार  संतोष घस्ती यांनी दिली असून अधिक तपास हवालदार अशोक शेळके करत आहेत.

               प्रशासनाच्या जागृतीमुळे आजरा तालुक्यात समूह संसर्गाचा धोका इतर तालुक्याच्या तुलनेत कमी आहे. तर आज मंगळवार दिनांक २१ रोजी आजरा तालुक्यामध्ये कोरोना भरारी पथकाने पेरणोली,हरपवडे,कोरीवडे,देवकांडगाव,पारपोली, किटवडे या गावातील ५३ जणांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये विना मास्क फिरणाऱ्यां कडून ५३०० इतका दंड वसूल करण्यात आला. तहसीलदार विकास आहेर गटविकास अधिकारी बिडी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी पी.जी. चव्हाण ग्रामसेवक संदीप चौगुले,धनाजी पाटील ए.आय.पापडकर,दीपक भोंदे, काळे अशोक सानप यांनी पथकात भाग घेतला.

Post a Comment

0 Comments