बार्शी तालुक्याच्या सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त; वारदवाडी फाट्यावर पोलिस तैनात

जवळा/ प्रतिनिधी: सोलापूरसह बार्शी तालुक्यातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 1६ जुलै ते ३० जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. दवाखाने, जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.

लॉकडाउनचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस दलाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची कसून चौकशी होत आहे, दुचाकीवरून डब्बल सीट प्रवास करणाऱ्या वाहनांवर पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. सध्याच्या या कडक संचारबंदीमुळे पोलिसांवरील ताणही वाढला आहे. आता तालुक्याच्या सर्व सीमाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या सीमेवरील तपासणीवेळीही पोलिसांचा बंदोबस्त महत्त्वाचा ठरत आहे. शिवाय तालुक्यातील अनेक गावांनी स्वत:हून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासन गावकऱ्यांशी संवाद साधून यावर तोडगा काढण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. घरात राहूनच ह्या महामारीच्या संकटापासून दुर राहू. या सगळ्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments