पाऊसही अडकला लॉकडाउनमध्ये; पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत

एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे तर दुसरीकडे आता बळीराजावर निसर्ग सुद्धा रुसलेला पाहायला मिळत आहे.
            (फोटो सौजन्य:- गुगल स्रोत)

कोल्हापूरसह राज्यात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. जूनच्या सुरुवातीस काही दिवस व जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर पावसाने चांगलीच हजेरी लावली होती.मधेच निसर्ग चक्रीवादळामुळे पावसाने चांगलाच जोर धरला होता. एकूणच पावसाळा चांगला सुरू झाल्यामुळे शेतकरी खुशीत होता. पेरलेल्या खरिपाच्या पिकांनीही चांगलीच वाढ धरली होती.

पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिली आहे ती आजतागायत कायम आहे. खरिपाची उगवलेली पिके आता पाण्याअभावी कडक उन्हात करपून जायला सुरुवात झाली आहे. भात, भुईमूग या पिकांची तर दुबार पेरणी करायला लागेल की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

सध्याच्या कोरोनाच्या महामारीत एकीकडे सर्वसामान्य शेतकरी आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असताना आता पाऊसच लॉकडाउन झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

Post a Comment

0 Comments