दुर्गम भागात स्मार्ट टिव्हीलाच बनवला स्मार्ट टिचर ; 'उमेद' द्वारा इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागातील स्मार्ट एज्युकेशन सेंटरचा शुभारंभ

सध्याच्या कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा कधी सुरू होतील याची काहीच शास्वती राहिलेली नाही. दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. अशात विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्षे लांबणीवर पडल्याने एकूणच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अतोनात नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारण्यात आला. मात्र दुर्गम भागामध्ये असणारी इंटरनेटची समस्या पाहता, या ऑनलाईन शिक्षण पद्धतीपासून दुर्गम भागातील विद्यार्थी वंचित राहण्याचा धोका होता. मात्र ही समस्या ओळखून श्री प्रकाश गाताडे या प्राथमिक शिक्षकाच्या संकल्पनेतून  पालकांकडे असलेल्या स्मार्ट टीव्हीचा वापर शिक्षणासाठी करण्याकरिता स्मार्ट डिजिटल एज्युकेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे .  


या उपक्रमास डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत इंटरनेट चा उपयोग न करता उमेद फौंडेशन च्या साहाय्याने दुर्गम भागातील स्मार्ट एज्युकेशन सेंटरचा शुभारंभ वाकीचा धनगर वाडा येथे अनुस्कुरा शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक दशरथ आयरे यांच्या हस्ते  करण्यात आला .या उपक्रमामुळे ज्या पालकांकडे अँड्रॉइड टीव्ही आहे, तेथे आता सहज सोप्या पद्धतीने मुलं शिक्षणाचा आनंद घेतील . 

उमेद फौंडेशन ने या उपक्रम साठी मदतीचा हात देत पेन ड्राइव्ह व तांत्रिक सहाय्य वापरून विविध ठिकाणी दुर्गम भागात डिजिटल स्मार्ट एज्युकेशन सेंटर उभारण्याचा नवीन प्रयोग सुरू केला आहे.

कोरोनाच्या संकटात सगळीकडे ऑनलाईन शिक्षण चर्चा असताना इंटरनेट नसलेल्या भागात प्रकाश गाताडे  यांनी हेमलकसा येथील शिक्षण प्रयोगातून प्रेरणा घेत शिक्षण आले दारी हा उपक्रम दशरथ आयरे अमोल काळे , अनिल कांबळे ,सलीम कागवडे यांच्या मदतीने अनुस्कुरा केंद्रातील चार शाळातील सात गावात/वाड्या वस्तीवर राबविला आहे.

यासाठी  अभ्यासक्रम वर आधारित स्वतःचे शैक्षणिक व्हिडिओ प्रकाश गाताडे सर ,अमोल काळे  अनिल कांबळे , दशरथ आयरे , दिनेश कांबळे , सलीम कागवडे , विलास पाटील सर प्रीतम गवंडी यांनी तयार केले आहेत.

Post a Comment

0 Comments