हजारो स्वॅब तपासणीविना तसेच पडून; तपासणी किट संपल्याने कालचा पाॅझिटीव्ह आकडा कमी

 जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे आता आरएनए (रायबोज न्यूक्‍लिक अ‍ॅसिड) एक्स्ट्रॅक्शन किटच संपले आहेत.यामुळे ३१ तारखेचा पाॅझिटिव्ह रूग्णाचा आकडा कमी दिसला. 

कोरोना चाचणीसाठी हे किट अत्यंत महत्त्वाचे असते.यामुळे हजारो स्वॅब तपासणीविना तसेच पडून आहेत. समूह संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्ह्यातील हॉट स्पॉट असणार्‍या ठिकाणी नागरिकांची त्वरित तपासणी करण्यासाठी अँटिजेन किट मागविण्यात आले होते.मात्र आता संसर्ग टिपेला पोहोचला असतानाच अँटिजेन किटही संपली आहेत. आरएनए एक्स्ट्रॅक्शन किट संपल्याने सुमारे साडेतीन हजाराहून अधिक स्वॅब तपासण्या प्रलंबित आहेत. यामुळे रुग्णांचे तसेच नातेवाईकांचे हाल होत आहेत. स्वॅबचा अहवाल प्रलंबित असल्याने अनेकांना मानसिक त्रासास सामोरे जावे लागत आहे.

अँटिजेन किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सातारा जिल्हा आरोग्य विभागाकडे जिल्हा प्रशासनाने १ हजार किटची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments