विशेष लेख:- मास्कच्या आतील दुःख- अमृता घाटगे

✒️अमृता राजेंद्र घाटगे

गेले तीन चार महिने झाले, आपण ऐकत आहोत मास्क घाला, हात धुवा, बाहेर पडु नका, 'नाही हे सगळे गरजेचे आहेच', पण त्या बरोबरच मास्क च्या आतील दुःख पण हृदयविदारक आहे. आपल्या कडे तीन वर्ग आहेत. उच्च, मध्यम आणि कनिष्ठ हे आपण जाणुन आहोतच. 

कोरोना काळात सगळ्यांत जास्त भरडला गेले आणि जात आहेत सर्वसामान्य लोक. यामध्ये मोलमजुरी करणारे, छोट्या-छोट्या वस्तू विकुन उदरनिर्वाह करणारेही लोक आहेत (हातावरचे पोट असलेले)  ज्यांना आज काम नाही केले तर संध्याकाळी घरात चुल नाही पेटत, ज्यांना आज काम नाही केले तर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न समोर येतो, त्यांनी काय करायचं?? याचा विचार कुणी केलाय का, लाॅकडाऊन केले म्हणुन सगळे ठीक होईल. होईल पण त्याच बरोबर सर्वसामान्याची परवड जास्त वाढली. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती या वस्तू सर्वसामान्यांना परवडतील का? ३० रूपये, २५ रुपये भाजीची पेंडी लोकांना परवडेल, हा विचार विक्रेत्यांनी केला का कारण लाॅकडाऊन सगळीकडे आहे. 

ज्यांच्या ऐकवेळच्या जेवणाची सोय आहे का नाही त्यांना माहीत नाही. त्यांना ह्या वस्तू परवडतील हा विचार कुणी केला ? सगळे कुटुंब एकत्र, वर्षानूवर्षे त्यांना असा वेळ एकत्र घालवायला मिळाला नसेल, त्यात सगळ्या शाळांना सुट्टी मुले घरात त्यामुळे तर नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पण 'नव्याचे नऊ दिवस असतात' तसेच लाॅकडाऊनची कंटाळा, वैताग आणि राग येऊ लागला.

लोकांचे छोटे- छोटे उद्योगधंदे पण बंद झाले, सर्वसामान्यांन बरोबर सगळ्यांमध्ये  नैराश्येच वातावरण निर्माण झाले. हातात काम नाही, पैसा नाही तर घर कसे चालणार हा गंभीर प्रश्न आ वासून उभा राहिला, त्यात जीवनावश्यक वस्तूं आणि भाजीपाला यात होत असलेली लुटमार तर जास्त वाढली. हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर लावा आणि महत्वाचे म्हणजे मास्क घाला. 

सर्वसामान्यांना या वस्तू परवडतील का?? मास्कच्या आतील जो चेहरा आहे त्याच्या तोंडात दोन घास गेलेत का याचा विचार करणे आवश्यक आहे आणि म्हणुनच लोक पोलीसांचे दांडके खाऊन पण पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यांवर येत आहेत. निवडणुकीच्या वेळी किंवा  इतरवेळी दारात येणारे सरकार आता कुठे गेले
कोरोना वर लस निघेल का नाही माहीत नाही पण तोपर्यंत.भुकबळीनेच लोक मरून जातील हे नककी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची परवड थांबवणे गरजेचे आहे.

          

Post a Comment

2 Comments

  1. Wow... exemplary.. touching.. nice

    ReplyDelete
  2. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचा उत्तम प्रयत्न

    ReplyDelete