उदयनराजेंच्या शपथेवरून व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण

भाजपचे राज्यसभेचे नूतन खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली होती.शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी', अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नायडूंवर टीका केली.


"मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आणि देवी भवानीचा भक्त आहे. रिती-रिवाजानुसार शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याची आठवण मी सदस्यांना करून दिली. कोणताच अनादर केला नाही", असं ट्विट वैंकय्या नायडूंनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments