गांधी कुटुंबीयांपासून काँग्रेसला वाचवण्याची गरज;उमा भारतीचा हल्लाबोल

राजस्थानात आमदारांच्या घोडेबाजाराच्या आरोपानंतर राजकीय संघर्ष उफाळून आला. हा संघर्ष अजूनही थंड झालेला नाही. अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. राज्यातूल सुरू झालेला हा संघर्ष आता न्यायालयापर्यंतही पोहोचला आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या राजकीय वातावरणावरून भाजपा नेत्या उमा भारती यांनी गांधी कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे. आम्ही देशाला काँग्रेसपासून वाचवलं आहे. परंतु आता काँग्रेसच्या लोकांना नेहरु आणि गांधी कुटुंबीयांपासून पक्षाला वाचवायला हवं, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.


उमा भारती एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, “आम्ही देशाला काँग्रेसपासून वाचवलं आहे. परंतु आता काँग्रेसच्या लोकांना नेहरू, गांधी कुटुंबीयांपासून पक्ष वाचवण्यासाठी पुढे यायला हवं. पीव्ही नरसिंम्हा राव यांच्या कार्यकाळात काँग्रेस नेहरू आणि गांधी कुटुंबीयांपासून मुक्त झाली असं वाटत होतं. परंतु दिग्विजय सिंह आणि अर्जुन सिंह यांच्यासारख्या नेत्यांनी ते होऊ दिलं नाही,” असंही त्या म्हणाल्या.

Post a Comment

0 Comments