कागल / प्रतिनिधी: कागलमध्ये अक्षय सोनूले या 30 वर्षीय युवकावर सपासप वार करून भरवस्तीत खून झाल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी मंदिर समोर दुचाकी वरून आलेल्या दोघांनी हा खून केल्याची माहिती मिळत आहे. अक्षय़ देखील बुलेट वरून येत असल्याचे सांगण्यात येतय. त्याच्या शरीरावर सोळा वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती आहे. रक्ताच्या थारोळ्यात अक्षय टाकून मारेकऱ्यांनी पोबारा केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून अक्षयचा मृतदेह कोल्हापूर येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे अधिक तपास करत आहेत.
0 Comments