आज शनिवार दिनांक २५ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण ४०६ पॉझिटिव्ह आले आहेत.जिल्ह्यात सध्या लॉकडाउन सुरू असताना देखील आज इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
तसेच आज कोरोनामुळे तब्बल १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने मृत्युदर सुद्धा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आजच्या दिवसातील दिलासादायक बाब म्हणजे, आज दिवसभरात १६५ कोरोना मुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील आजपर्यंतची एकूण रूग्णसंख्या ही ४०५७ झाली आहे तर अॅक्टिव्ह रूग्णसंख्या २५३४ इतकी आहे. दरम्यान गडहिंग्लज शहरातील ५५ वर्षीय साखर कारखाना संचालकांसह सहा जणांचे अहवाल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले.
◆ शहरातील २७ खाजगी रुग्णालये अधिग्रहण करणार
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सध्याची कोव्हिडं सेंटर मधील बेड अपुरे पडत आहेत. यामुळेच जिल्हा प्रशासनाने शहरातील २७ खाजगी रुग्णालये अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या रुग्णालयात नव्याने दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
◆ सीपीआर आता पूर्णतः कोरोना रुग्णालय
अपुऱ्या बेडच्या उपलब्धतेमुळे काल जिल्ह्यात ३ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. याची गंभीर दखल घेऊन आता सीपीआर रुग्णालय पूर्णतः कोरोना रुग्णालय म्हणून वापरण्याचे आदेश पारित झाले आहेत. यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर वेळेवर उपचार केले जातील.
0 Comments