पंढरीत ९० वर्षांच्या आजीबाईची कोरोनावर मात

पंढरपूर/प्रतिनिधी:

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण देखील बरे होत आहेत. त्यातच आता एका ९० वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केली आहे. पंढरपूर येथील वाखरी कोविड सेंटर मधून कोरोनामुक्त झालेल्या या आजीला आज डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात ११ कोरोना रुग्ण मुक्त झाले. पंढरीत आज ११ कोरोना ग्रस्ताची नोंद करण्यात आली. पंढरीतील कोरोनाची संख्या ५३३ वर गेली आहे. 
   महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध कोरोना रुग्ण असणाऱ्या ९० वर्षीय या आजीने कोरोनावर मात केली. आजींना वाखरी येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते.  आतापर्यंत २०६ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. 

  डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ, यानी योग्यप्रकारे आजींवर उपचार केले. आणि आता या आजी कोरोनामुक्त झाल्या आहेत. या आजींना डिस्चार्ज देताना, सर्व मेडिकल स्टाफ उपस्थित होता. सर्वांनी टाळ्या वाजवून आजींचं अभिनंदन केलं.

Post a Comment

0 Comments