अबब...जिल्ह्यात एका दिवसात तब्बल तीनशेचा आकडा पार

कोल्हापुरात आज एका दिवशी पॉझिटिव्ह चाचणी येणाऱ्या रुग्णसंख्येने विक्रमी आकडा पार केला आहे. आज शुक्रवारी एका दिवसात जिल्ह्यात सायंकाळपर्यंत तब्बल ३०० च्या वर रुग्णसंख्या पोहचली आहे. 




एकीकडे जिल्ह्यातील रुग्णालये कोरोना रुग्णांनी हाऊसफुल्ल होत आहेत तर दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने प्रशासन तसेच नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

काल गांधीनगर येथील एका व्यक्तीस वेळेवर बेड न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही घटना पाहता जिल्ह्यातील स्थिती बिकट बनत चालली आहे, हे लक्षात येते. प्रशासनाने आता नवीन कोव्हिडं सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. तसेच या नवीन कोव्हिडं सेंटर साठी योग्य वेळेत आवश्यक कुशल मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments