बोकडाची पार्टी गावाला भोवली ; पोलीस कर्मचाऱ्यांचा कैद्यासह मटणावर ताव; कैदी निघाला कोरोना पॉजिटिव्ह



पंढरपूर/प्रतिनिधी: कोरोनाच्या काळात कुठं काय घडलं हे सांगता येत नाही. मंगळवेढा कारागृहातून कैद्याने आंबे ता. पंढरपुर येथे बोकड पार्टीचं आयोजन केले. त्या मोहात दोघा पोलीसांनी त्या कैद्यासाठी खास वाहनाची व्यवस्था करून आंबे या गावी घेऊन आले. त्या बोकडाच्या जेवणाला चक्क शंभर ग्रामस्थही उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी त्या कैद्याची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली. मंगळवेढा पोलीस आणि आंबे गावात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कैदी, ते दोन पोलीस कर्मचारी, तसेच बोकड पार्टीचे आयोजक व आंबे गावातील उपस्थित 30 ते 40 ग्रामस्थावर पंढरपुर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना  निलंबित करत कारवाई  केल्याची माहिती अतिरिक्त पुलिस अधिकारी अतुल झेंडे यांनी दिली. 
    कोरोनाचा पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. आंबे गावात १७ जुलै रोजी शिवाजी बलिराम भोसले यांनी बोकड पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत पोलीस कॉन्स्टेबल उदय ढोणे, बजरंग माने यांनी सबजेलमधे खुनातील आरोपी असलेला तानाजी भोसले याला पोट दुःखीचा त्रास होत असल्याचे कारण दाखवून पंढरपुर तालुक्यातील आंबे या ठिकाणी आणले होते. 

त्या दिवशी पार्टी झाल्यानंतर त्या कैदाची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह निघाल्यानंतर कैद्याबरोबर ताव मारणारे ग्रामस्थ होम क्वॉरटाइन झाले आहेत. मात्र या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ माजली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनाला भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच तीन कैदी सब जेल मधून पळून गेले होते. त्या प्रकरणीच्या चौकशी आदेश दिले आहेत. तालुक्यात कोरोना आटोक्यात यावा म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून आरोपी सबजेल मधून फरार होणे, पॉजिटिव्ह कैद्यासोबत पोलीसांची पार्टी यामुळे पोलीस खात्याचा विचित्र कारभारही समोर आला आहे. 
   बोकड पार्टीत सहभागी झालो म्हणून आता कोरोनाची लागण होतेय की काय अशी भिती ग्रामस्थांना लागून राहिली आहे. या एका घटनेनं गावात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तालुक्यातील कोरोनाच्या घडामोडी पाहता रुग्ण वाढत असल्यानं यापुढच्या काळात अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments