कागल: प्रतिनिधी
कागल निढोरी मार्गावर व्हन्नूर जवळ आज सकाळी ट्रक आणि दुधाच्या टेम्पोचा अपघात झाला. मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने समोरून येणाऱ्या दुधाच्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक बसली. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये एका स्थानिक महिलेला डोक्याला मार लागल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित लोकांकडून मिळाली. अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.
0 Comments