आजअखेर ११३६ जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 आज सकाळी १० वाजेपर्यंत ४०६ प्राप्त अहवालापैकी २९२ निगेटिव्ह तर ८३ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (१२ जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह तर १९ अहवाल नाकारण्यात आले आहे.) प्रतिजन चाचणीचे १० प्राप्त अहवालापैकी ७ निगेटिव्ह आहेत, तर ३ पॉझीटिव्ह असे एकूण ८६ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ३३९३ पॉझीटिव्हपैकी ११३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण २१६१ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

 आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त ८६ पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-१, हातकणंगले- ३, करवीर-१७, पन्हाळा-४, राधानगरी-५, शाहूवाडी-४, शिरोळ-१, नगरपालिका क्षेत्र- ९, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४२ असा समावेश आहे. 

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- १०४, भुदरगड- ९४, चंदगड- ३२८, गडहिंग्लज- १८५, गगनबावडा- ७, हातकणंगले- २१४, कागल- ७५, करवीर- ३८२, पन्हाळा- १४४, राधानगरी- १०९, शाहूवाडी- २३७, शिरोळ- ९२, नगरपरिषद क्षेत्र- ७५१, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-६१७ असे एकूण ३३३९ आणि इतर जिल्हा व राज्यातील ५४ असे मिळून एकूण ३३९३ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण ३३९३ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ११३६ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ९६ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २१६१ इतकी आहे.

Post a Comment

0 Comments