दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई - बहुप्रतिक्षित अशा दहावीच्या निकालाची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. उद्या बुधवारी दिनांक २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 
       महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चशिक्षण मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा एकूण नऊ विभागात मार्च २०२० मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यापैकी भूगोलाचा पेपर न झाल्याने निकाल कसा असेल याबद्दल विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

उद्या दुपारी एक नंतर दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा.

www.maharesult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

Post a Comment

0 Comments