उस्मानाबादेत कापड व्यावसायिकाच्या कुटुंबासह नातेवाईक १० जण करोनाबाधित; एकाच दिवसात जिल्ह्यात सर्वाधिक १०५ रुग्णाची नोंद...

लॉकडाउनच्या चारही टप्प्यांमध्ये करोनाला रोखलेल्या उस्मानाबाद शहरात अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यापासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर जिल्ह्यात एकाच दिवसात १०५ बाधितांची नोंद झाली आहे. उस्मानाबाद शहरात एका कापड व्यावसायिकाच्या कुटुंबासह त्याच्या नातेवाईकांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरात एकुण २४ रुग्ण एकाच दिवसात सापडले आहेत, तर तालुक्याची एकूण रुग्ण संख्या ३८ झाली आहे.


जिल्ह्यात तब्बल 105 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. सर्वाधिक संख्या उमरगा तालुक्यात 47, उस्मानाबाद 38, वाशी 7, तुळजापूर 5, कळंब 5 तर परंडा तालुक्यात 3 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात 29 जुलैच्या दुपारपर्यंत एकुण करोनाबाधितांची संख्या 834 वर पोहचली असून, 482 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील 304 आणि बाहेरील जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद येथे उपचार घेत असलेले 4 अशा एकुण 308 जणांवर उचार सुरू असून 44 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments