कोल्हापुरात कोरोना बाधितांची चार हजाराकडे वाटचाल

 
दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजही (ता.२५) सायंकाळी सहापर्यंत तब्बल १५८ बाधितांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची चार हजारांकडे वाटचाल सुरु झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ८१२ जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत साडे अकराशे जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०२ जणांचा बळी गेला आहे.




Post a Comment

0 Comments