कोरोनाने धास्तावली विठ्ठल नगरी ; ७० नव्या रुग्णांसह आकडा पोहचला ५०० पार


पंढरपूर/प्रतिनिधी:

कोरोना विषाणूच्या प्रकोपाने आता विठ्ठलाची नगरी धास्तावली आहे. कोरोना संक्रमणासह मृत्यूची साखळी तोडण्यात यश आले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला असून, आतापर्यंतच्या एका महिन्यात बाधितांचा उच्चांक गाठला आहे. बुधवारी पंढरीत ७० कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाचा आकडा ५०० पार गेला आहे. कोरोनाचा विळखा विस्तारत असल्याने प्रशासन पुरते हादरले आहे. 
  पंढरपुर शहर व तालुक्यात ३७२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना बाधितांची संख्या ५२३ वर पोचली आहे. आजपर्यंत १९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ९ जणाचा कोरोनामुळे मुत्यु झाला आहे. 

आज सरकोलीतील ५२ वर्षीय पुरुषाचा, पंढरपुरातील कदबे गल्लीतील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंढरपुरातील बंकटस्वामी मठ परिसरात सहा, डाळे गल्ली, मनिषा नगर, महाद्वार शॉपिंग सेंटर, काळा मारुती मंदिराजवळ, सावता माळी मंदिराजवळ दोन, पद्मावती झोपडपट्टी, कालिका देवी चौक, तानाजी चौक, तिरंगा नगर, गोविंदपुरा, इंदिरा गांधी मार्केट, फुलचिंचोली, करोळे, लक्ष्मी टाकळी येथे प्रत्येकी एक, गांधी रोड, शितल शहा हॉस्पिटलजवळ, परदेशी नगर, संत पेठ येथे प्रत्येकी दोन, घोंगडे गल्लीत पाच, जुनी पेठेत चार, कदबे गल्लीत तीन, रामबाग रोड परिसरात तब्बल २१, झेंडे गल्लीत सहा रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता प्रशासनाकडून कडक उपाय योजना केल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments