टोप येथे १० जुलै रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. तो ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेला हा व्यक्ती गावातील पहिलाच कोरोनाचा रुग्ण होता. रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले होते. तर या रुग्णांच्या संपर्कातुन एक डाँक्टरही कोरोना पाँझिटीव्ह झाले होते.
यामुळे गावात अधिकच भिती पसरली होती. पण काहीच दिवसापुर्वी कोरोनावर मात केलेल्या डाँक्टरांना घरी पाठवले होते. तर आज गुरुवारी त्या गावातील पहिला रुग्ण बरा होऊन घरी आल्यामुळे टोप गावातील गावकऱ्यांना थोडा धीर आला आहे. या रुग्णाचे स्वागत महाडीक काँलनी येथील नागरिकांनी पुष्पवर्षावात केले. हा रुग्ण बरा झाल्यामुळे गावात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ही तीनच राहीली असून एक मृत्यू झाला आहे. गाव लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा सध्या नागरिकातुन व्यक्त होत आहे.
0 Comments